माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केल्याचा शेजाऱ्यांचा आरोप; सावकाराचा आरोप व्यक्तिद्वेशातून – राजेश क्षीरसागर
या मारहाण प्रकरणी पीडित मुलीने यासंदर्भातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका व्हिडीओद्वारे गाऱ्हाणे मांडले आहे.
कोल्हापूर: शिंदे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे पुन्हा एकदा वादामध्ये गुरफटले आहेत. क्षीरसागर व त्यांच्या मुलाने बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या शेजाऱ्यांनी केला आहे. तर, हा आरोप व्यक्तिद्वेशातून केला असून तक्रारदार व्यक्ती सावकारी कर्जप्रकरणी कारवाई झालेली असल्याचे क्षीरसागर यांच्या समर्थकांनी सोमवारी म्हटले आहे.
तक्रारदार राजेंद्र वरपे (वय ५७) आणि राजेश क्षीरसागर हे शिवगंगा संकुलात एकत्र राहतात. याच्या टेरेसवर राजेश क्षीरसागर,त्यांची मुले यांची रात्री उशीरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. त्याचा गोंगाट होत असल्याने आवाज कमी करा सांगितल्यावर, समजवायला गेल्यावर पितापुत्रांनी मारहाण केली. त्यांनी क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.
तर सोमवारी पत्रकार परिषदेत राजेश क्षीरसागर हे सदनिका सोडण्यास भाग पाडत आहेत. त्यासाठीच दबाव आणला जात आहे. त्यामुळे क्षीरसागर यांची चौकशी न झाल्यास जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे,असा इशारा दिला.
- तर या मारहाण प्रकरणी पीडित मुलीने यासंदर्भातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका व्हिडीओद्वारे गाऱ्हाणे मांडले आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमचे जवळचे सहकारी राजेश क्षीरसागर हे आम्हाला वारंवार त्रास देत आहेत. माझे वडील त्यांना समजवायला गेले, तेव्हा क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज या दोघांनी वडील व १५ वर्षांच्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास टेरेस वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा तिने दिला आहे. सोन्या मारुती चौकात राहणारे खाजगी सावकार राजेंद्र वरपे यांनी दीपक पिराळे यांना सव्वा १८ लाखाचे कर्ज दिले होते. त्याची वसुली म्हणून वरपे यांनी पिराळे यांची सदनिका बळजबरीने घेवून ती मेहुणीच्या नावे केली. पिराळे यांनी याची तक्रार राजेश क्षीरसागर यांच्या कडे केल्यावर वरपे व कुटुंबीयांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात खोटी तक्रार देवून बदनामी चालवली आहे , असे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात दिले आहे.पोलीसात केली आहे.