मुंबई

गजानन काळेंची पोस्ट चर्चेत,अस्सल ठाकरे! “राज ठाकरे असोत किंवा शर्मिला ठाकरे, मनाचा मोठेपणा…

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्याविषयी केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई :   दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली. यानंतर सरकारने याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या एसआयटी चौकशीला विरोध करण्यात आला आहे. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सरकारतर्फे जाणूनबुजून या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या निर्णयाविषयी शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी कायमच मनाचा मोठेपणा दाखवला आहे असं गजानन काळेंनी म्हटलं आहे. ती पोस्ट चर्चेत आहे.

आदरणीय राजसाहेब ठाकरे असो किंवा शर्मिला वहिनी… ठाकरेंचा मनाचा मोठेपणा काय असतो हे नेहमी दोघांनी आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून कायमच दाखवले आहे …

ठाण्याला सेनेचा महापौर बसावा म्हणून मनसेच्या ९ नगरसेवकांचा पाठिंबा देणे असो नाहीतर वरळी मध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचा उमेदवार न देणे असो ,आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी कायम राजकारणापलीकडे नातं जपलं …

याउलट मुंबईतील मनसेचे ६ नगरसेवक खोके देवून फोडणे असो नाहीतर राजसाहेबांवर भाषण केले म्हणून केसेस टाकणं असो.मनसे हा संपलेला पक्ष म्हणून आदित्य यांनी केलेली विधाने असो अशी अनेक उदाहरणं देता येतील की यांच्याकडून मात्र कायमच राजकारणच करायचा प्रयत्न केला गेला …

फरक स्पष्ट आहे. अशी पोस्ट गजानन काळे यांनी केली आहे.आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही आरोप झाले असून राज्य सरकारने त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही एकाच कुटुंबातील आहात, त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, आदित्य असे काही करेल, असे मला वाटत नाही. चौकशा कुणीही कुणाच्या लावू शकतो. आम्ही पण याच्यातून खूप गेलो आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button