मुंबई

रतन टाटा यांनी 1996 मध्ये लिहिलेलं पत्र; कोण आहे ती व्यक्ती?’प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे,हर्ष गोयंकांनी केलं उघड

रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी रात्री त्यांचं निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर काहीजण त्यांची भेट झाल्यानंतर आलेले अनुभव, आठवी शेअर करत आहेत. आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी एक्सवर रतन टाटा यांनी लिहिलेलं एक पत्र शेअर केलं आहे. हे पत्र रतन टाटा  यांनी 1996 मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान नरसिम्हा राव  यांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी भारतातील अत्यंत आवश्यक आर्थिक सुधारणांची घोषणा करताना नरसिम्हा राव यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आदर व्यक्त केला.

1996 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून तिला परिवर्तनाच्या मार्गावर नेण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना अनेकदा ‘भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक’ म्हटलं जातं. रतन टाटा यांनी नरसिम्हा राव यांनी देशाला जागतिक स्तरावर नेल्याबद्दल कौतुक केलं होतं. रतन टाटा यांनी सांगितलं होतं की, “प्रत्येक भारतीयाने तुमचं ऋणी असले पाहिजे”.27 ऑगस्ट 1996 रोजी लिहिलेल्या या पत्रात रतन टाटा यांनी लिहिलं आहे की, “तुमच्याबद्दलचे अलीकडे आलेले दुर्दम्य संदर्भ वाचताना, मला तुम्हाला हे सांगायला लिहावेसं वाटलं की इतरांच्या आठवणी लहान असल्या तरी, भारतातील अत्यंत आवश्यक असलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये  तुमच्या उल्लेखनीय कामगिरीचा मी आदर करीन. तुम्ही आणि तुमच्या सरकारने आर्थिक बाबतीत भारताला जगाच्या नकाशावर आणले आणि आम्हाला जागतिक समुदायाचा भाग बनवले. प्रत्येक भारतीयाने तुमच्या धाडसी आणि दूरदर्शीबद्दल ऋणी असले पाहिजे. मला वैयक्तिकरित्या विश्वास आहे की तुमची कामगिरी महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे – आणि ती कधीही विसरता कामा नये”.पत्रात स्पष्टपणे वैयक्तिक असं लिहिलं आहे. 27 ऑगस्ट 1996 रोजी टाटा समूहाचे मुख्य कार्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसच्या कागदावर हे पत्र लिहिण्यात आलं आहेया पत्राचा उद्देश एवढाच आहे की यावेळी माझे विचार आणि शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि किमान अशी एक व्यक्ती आह जी तुम्ही भारतासाठी केले आहे ते कधीही विसरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button