नवी मुंबई

पनवेल ते सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल, लोकल सेवा विस्कळीत.

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरल्याची घटना घडली.

सीएसएमटी रेल्वे स्थानकाम्यान लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणारी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे.सकाळी ११.३५ वाजता सुमारास सीएसएमटी लोकल प्लँटफार्म क्रमांक २ वर प्रवेश करत असताना लोकलच्या एक डबा रुळावरून घसरला. डब्यात बसलेल्या प्रवाशाना जोरदार झडटका बसला. त्यामुळे काहीकाळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण चालकाने नियंत्रण मिळवत लोकल ट्रेन थांबवण्यात यश मिळवले. लोकल थांबताच प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या घेतल्या. रेल्वे रुळावरून चालत सीएसएमटी स्थानक गाठ असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झाली नाही. दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल सेवा स्थगित करण्यात आल्याची घोषणा रेल्वेने केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले.रेल्वे रुळावरून घसरलेला लोकल ट्रेनचा डबा उचलून रेल्वे रुळावर आण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न काम सुरू केले आहे.

या घटनेमुळे सीएसएमटी ते पनवेल दरम्यानच्या लोकल सेवा ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवा एका मागे एक उभ्या असल्याने प्रवासी लोकल डब्यात अडकून पडले आहे. आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी लोकल रेल्वे रुळावरून घसरल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले असून रेल्वेच्या कारभारवार प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.या घटनेमुळे प्रवाशांना कसलीही इजा झालेली नाही. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मस्जिद स्थानकापर्यंत आणल्या जात आहे. हार्बर मार्गावरील सेवा वडाळ्यापासून सुरू राहतील. घसरलेल्या रेल्वे डब्या रेल्वे रुळावर आण्यासाठी अभियांत्रिकी पथक काम सुरू केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button