अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक
मुंबई : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना दिलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज झाले आहेत.मंगळवारी वर्षा गायकवाड आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी नाराज काँग्रेस नेत्यांनी वांद्रेच्या एमसीएला एक बैठक बोलावली.या बैठकीत माजी मंत्री नसीम खान,आमदार भाई जगताप,माजी मंत्री सुरेश शेट्टी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अमरजितसिंह मनहास हे उपस्थित आहे.उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक,दलित आणि उत्तर भाषिक मतदारांचे प्राबल्य आहे.माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप हे उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र गायकवाड यांनी उमेदवारी मिळवल्यामुळे हे नेते नाराज झाले आहेत. नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने एकाही अल्पसंख्यकाला उमेदवारी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वर्षा गायकवाड या उद्या (मंगळवारी) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. दुसरीकडे या मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन याचा पत्ता कट करुन कायदेतज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.आपल्या चार टर्म आमदारकी दरम्यान गायकवाड यांनी एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून तर एकदा राज्य मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आता वर्षा गायकवाड यांना प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांचे आव्हान असणार आहे. भारतीय जनता पक्षाने नुकतेच निकम यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.