मुंबई

निवडणूक आयोगाची कारवाई,दादरमध्ये १.१४ कोटींची रोकड जप्त

१.१४ कोटींची रोकड जप्त करण्यात आलीय. दादरमध्ये निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. हा पैसा कुठुन आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ऐन निवडणुकी च्या रणधुमाळीत एका चारचाकी गाडीतून १.१४ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. दादरमध्ये निवडणूक आयोगाने  ही कारवाई केली आहे. हा पैसा कुठुन आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात इतका जास्त पैसा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा पैसा कुठे नेला जात होता, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हेलिअन्स टीमने ही कारवाई केली आहे. वाहनचालक कॅश संदर्भात समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईमध्ये ) १.१४ कोटी रुपये रूपये जप्त करण्यात आले आहेत. रोकड जप्त केल्यानंतर केलेल्या चौकशीमधून महत्वाची माहिती समोर आली आहे.ही जप्त केलेली रोकड लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाची असल्याची माहिती मिळत आहे. रक्कम मोठी असल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला दिली माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. सध्या राज्यात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.दोन टप्प्यातील मतदान पार पडलंय, तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू  आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने राज्यात मागील ४५ दिवसांत ४० कोटीपेक्षा अधिक रक्कम पकडल्याची माहिती मिळत आहे.मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने २७ एप्रिल रोजी भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची घटना घडली होती. यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे.लोकसभा निवडणुकी ची आचारसंहिता सुरु झाल्यानंतरच्या काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध असतात. तरी देखील मुंबईत मोठ्या प्रमाणावर रोकड रक्कम दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button