maharastra

भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

सोलापुरमधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप उमेदवार राम सातपुते  यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.सोलापुरमध्ये भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजप विरोधात मिम्स वायरल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जनमाणसांत प्रतिमा मलीन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. भारतीय दंड संहिता कलम 500 आणि 501 नुसार या बदनामी प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलापुरात भाजप आणि राम सातपुतेंविरोधात मिम्स व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बदनामी केल्या प्रकरणी आता एका कॉंग्रेस  कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे मिम्स व्हायरल झाल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. मे महिन्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. ७ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सोलापूरमध्ये रणधुमाळी पाहायला मिळत  आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. निवडणुक जवळ येत आहे, तसतशी अनेक राजकीय घडामोडी सोलापूरमध्ये घडत (Solapur Politics) आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आपापले प्रचार करत आहे. प्रचारादरम्यान उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. अशातच आता भाजप उमेदवाराची सोशल मीडियावर बदनामी केल्याचं समोर आलंय, त्यामुळे वातावरण आणखी तापलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button