maharastra

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला वीस वर्षांची शिक्षा-बुलढाणा

बुलढाणा : राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्याने समाज मन सुन्न झाले आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेत बलात्कार करणाऱ्या नराधम युवकास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तब्बल वीस वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली आहे.अल्पवयीन मुलींवर वाईट नजर ठेवून कुकृत्य करण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या विकृतांसाठी हा निकाल जरब बसविणारा ठरणार आहे. बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला. ही घटना देऊळगांव राजा पोलीस ठाणे अंतर्गत घडली होती. देऊळगांव राजा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीला आरोपी मनोज डोंगरे याने पळवून नेले. ४ मार्च २०१९ रोजी मनोजने तिला फुस लावली. गावातून पीडितेला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनी जालना गाठले. तिथे एका ट्रकमध्ये बसून छत्रपती संभाजीनगरला पोहचले. सायंकाळची वेळ होती. पायपीट करून त्यांनी रेल्वेस्टेशन गाठले आणि गुजरात राज्यातील सूरत कडे जाणारी रेल्वे गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी सूरत येथे पोहचल्यावर मनोजने खोली केली.दरम्यान, २० मे रोजी पीडितेवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इकडे मुलगी घरात दिसली नाही म्हणून पीडितेचे घरचे चिंतेत होते. मनोजवर संशय असल्याने तिच्या कुटुंबियाने मनोज डोंगरे विरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोस्को कायद्यानुसार आणि विविध कलम नुसार मनोज डोंगरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त तक्रारीवरुन देऊळगाव राजा पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास सुरू असताना हाती आलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हाचे ठिकाण (सुरत) गाठले. पीडितेला ताब्यात घेण्यात आले. २१ मे २०१९ रोजी पीडितेला देऊळगाव राजा येथे आणण्यात आले. जबाब नोंदविण्यात आला आणि पीडितेसह आरोपी मनोजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर, तपास नंतर बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड वसंत भटकर यांनी युक्तिवाद केला. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार सादर करण्यात आले. यामध्ये पीडितेचे आई आणि वडील, पोलीस तपास अधिकारी, वैदकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. विशेष म्हणजे, पीडितेच्या शाळेतील कर्मचाऱ्यांची साक्ष आणि प्रयोगशाळेचा अहवाल अतिशय महत्वाचा ठरला. दोन्ही पक्षांची बाजू, युक्तिवाद , सादर करण्यात आलेले साक्षीदार ,पुरावे लक्षात घेऊन बुलढाणा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आपला निकाल दिला. आरोपी युवकास विविध कलम अन्वये वीस वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. गुन्हाच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, प्रमोद भातनाते यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार सुनील साळवे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button