मुंबई

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

गुरूवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे मंत्रालयात फारशी गर्दीही नव्हती. तसेच, कर्मचारीही नव्हते. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी आणि अधिकारी घर पोहचायचे म्हणून निघून गेले होते.

मुंबई:  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची नासधूस केल्याची बातमी आहे.  मंत्रालयात  महत्त्वाचे अधिकारी, नेते आणि मंत्र्यांचा कायम राबता असतो. त्यामुळे मंत्रालयात कडेकोट बंदोबस्तही असतो. पण उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचीच नासधूस केल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीने यासंर्भात वृत्त दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस केली आहे. मंत्रालयात कडेकोट बंदोबस्त असतानाही देवेंद्र फडणवीसांच्या कर्यालयाची नासधूस करण्याची हिंमत कोणी केली. असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे मंत्रालयातील मंत्र्यांचे कार्यालयही सुरक्षित नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर  गृहमंत्री फडणवीस  यांचं कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे  मंत्रालयात फारशी गर्दीही नव्हती. तसेच, कर्मचारीही नव्हते. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती. पावसामुळे कर्मचारी आणि अधिकारी घर पोहचायचे म्हणून निघून गेले होते. सहा साडेसहाच्या दरम्यान एक महिला थेट फडणवीसंच्याकार्यालयात घुसली आणि आराडाओरडा करायला सुरूवात केली.कर्मचाऱ्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तिने झाडांच्या कुंड्या फेकून दिले्या होत्या. दालनाबाहेर लावलेली फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून त्यांनी फेकून दिली. पण पोलीस येईपर्यंत त्या महिलेने मंत्रालयातून पळूनही गेली. पण रात्री उशिरापर्यंत  ही महिला कोण होती हे समजू शकले नाही. मंभालयातील सुरक्षा विभागाकडून संबंधित महिलेचा शोध घेणे सुरू आहे.पण या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. धक्कादायक म्हणजे थेट फडणवीसांच्या कार्यालयाचीच नासधूस होत असताना पोलीस कुठे होते. महिला कोणत्या कामासाठी मंत्रालयात आली होती. तिला पास कोणी दिली. फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस करण्यासाठीच आली होती की इतर कामासाठी, नासधूस कऱण्यामागचा हेतू काय आणि एवढ सगळं करूनही ती पसार कशी झाली, सुरक्षा यंत्रणेचे लक्ष नव्हते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button