पुणे

पोलीस आयुक्तांनी जाहीर केला व्हॉट्सॲप नंबर; आता छेडछाडीची थेट तक्रार करा

छेडछाड झाल्याल थेट तक्रार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी केले असून, तक्रार नोंदवण्यासाठीचा व्हाॅटसॲप क्रमांकही पोलीस आयुक्तांनी जाहीर केला आहे.

पुणे : एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेतून महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार रोखण्यासाठी  छेडछाड झाल्याल थेट तक्रार करण्याचे  आवाहन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी केले असून, तक्रार नोंदवण्यासाठीचा व्हाॅटसॲप क्रमांकही पोलीस आयुक्तांनी जाहीर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटना घडल्याने पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास शाळकरी मुली, तरुणी, तसेच नागरिकांनी थेट व्हाॅटसॲप क्रमांकावर (व्हाॅटसॲप क्रमांक- ८९७५९५३१००) तक्रार करावी. तातडीची मदत हवी असल्यास किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात (संपर्क क्रमांक- ११२) तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून त्यानुसार कारवाई करण्यासाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. एखादी अनुचित घटना आढळून आल्यास नागरिक तक्रार करू शकतात. नागरिकांची तक्रार पोलिस ठाणे, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेला कळवून तातडीने कारवाई करण्यात येईल. पोलिस आयुक्त रितेश कुमार स्वत: हेल्पलाईनवर लक्ष ठेवणार आहेत, असे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button