मुंबई

प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’ ची सुरुवात – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार ‘रुग्णमित्र हेल्प डेस्क’

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई महानरपालिकेच्या प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये एक हेल्प डेस्क असावा हे सूचित केले होते. त्या अनुषंगाने  मुंबई महानगर पालिकेद्वारे हेल्प डेस्क सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सदर हेल्प डेस्क चे नाव रुग्ण मित्र असे ठेवण्यात आले असून रुग्णालयांच्या प्रमुख द्वरापाशी अथवा नोंदणी कक्षाच्या ठिकाणी हेल्प डेस्क चे केबिन स्थापन करण्यात येईल.

प्रमुख रुग्णालयात सकाळी ३, दुपारी २ आणि रात्री १ याप्रमाणे तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी २ आणि दुपारी २ या प्रमाणे हेल्प डेस्क साठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. रुग्णांना, त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित मदत करण्यासाठी, वेळेप्रसंगी आधार देण्यासाठी नम्र, संवाद कौशल्य उत्तम असलेले आणि सॉफ्ट स्किल्स व्यवस्थित रित्या आत्मसात केलेले कर्मचारीच नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असेल त्याच बरोबर संगणक हाताळण्याचे सुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button