गुन्हेगारी

८० कोटींच्या कंत्राटाचे आमिषाने व्यापार्‍याची दीड कोटींची फसवणूक

तमिळनाडू राज्यात पथदिवे लावण्याचे ८० कोटींचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून एका व्यापार्‍याला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

वसई – तमिळनाडू राज्यात पथदिवे लावण्याचे ८० कोटींचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून एका व्यापार्‍याला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही ठकसेनाचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईत राहणारे भूपेश सोलंकी यांचा वसईत एलईडी दिवे बनविण्याचा कारखाना आहे. त्यांना तमिळनाडू येथे राहणारा राजन कन्न आणि फ्रान्सिस जोसेफ या दोघांनी संपर्क केला. तमिळनाडू शासनाला राज्यात पथदिवे लावायचे आहेत. त्याचे ८० कोटींचे कंत्राट मिळवून देतो असे या दोघांनी फिर्यादी सोलंकी यांना सांगितले. शासनात ओळख असल्याचे दोघांनी यांना सांगितले. या कामााठी कमिशन तसेच काही अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. सोलंकी यांना आरोपींनी ५७ कोटी २० लाखा रुपयांचे बनावट निविदेचे कागदपत्र पाठवले. यामुळे सोलंकी यांचा विश्वास बसला. त्यांनी १ कोटी २१ लाख रुपये या दोन्ही आरोपींच्या बॅंक खात्यावर पाठवले. मात्र सोलंकी यांना कसलेच काम मिळाले नाही. चौकशी केल्यानंतर हा सर्व बनाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या दोन्ही आरोपींविरोधात कलम ४१९, ४२०, ४६८, ४७०, ४३७, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button