maharastraगुन्हेगारी

नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांवर हल्ला; दोन ठार, दोघे जखमी,माथेफिरूचे भयंकर कृत्य .

नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांकावर सातवर प्रवाशी रेल्वेची वाट पाहत होती. तेव्हा अचानक एका मनोरुग्णानं लाकडी दांडक्याने प्रवाशांवर हल्ला केला

नागपूर : रेल्वे स्थानकावर गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांवर एका माथेफिरूने हल्ला केला, यात दोघे ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली.केलेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांकावर सातवर प्रवाशी रेल्वेची वाट पाहत होती. तेव्हा अचानक एका मनोरुग्णानं लाकडी दांडक्याने प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. मनोरुग्णानं लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा आरोपी फलाटावर लोकांना मारत सुटला होता. आरोपी हल्ला करुन पळत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर ऐन गर्दीच्यावेळी एक मनोरुग्ण हातात लाकडी दांडकं घेऊन स्थानकावर उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला करत सुटला. रेल्वे रुळाच्या कामासाठी वापरात येणाऱ्या लाकडी दांडक्याने लोकांवर तो हल्ले करत होता. अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकावर एकच खळबळ उडाली. लोकं सैरावैरा पळू लागली. आरोपीने चार लोकांवर हल्ला केला. यात अतिरक्तस्त्रावामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे रुळावरुन पळू लागला. त्याचवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत आरोपीचा पाठलाग करुन त्याला पकडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम केवट असं आरोपीचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button