Railway Bonus: सणासुदीत केंद्र सरकारकडून मोठी भेट, DA नंतर ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर..
दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या ११ लाखांहून अधिक बिगर गॅझेट भेट दिली आहे. रेल्वे विभागातील अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराइतका बोनस दिला जाईल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी . मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मोदी सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) चार टक्के वाढ करण्यास मंजुरी देत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या कामगिरीशी निगडित बोनस देण्याचा निर्णयही घेतला आहे. यासाठी १,९६९ कोटी रुपये खर्च केले जाणार असून याचा फायदा ११ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ आणि CCEA बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय ११ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला गेला असून तिसरा निर्णय शेतकऱ्यांशी संबंधित आहे. सहा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तेलबिया आणि मोहरीच्या दरात २०० रुपये, मसूर ४२५ रुपयांनी, गहू १५० रुपयांनी, बार्ली ११५ रुपयांनी, हरभरा १०५ रुपयांनी आणि सूर्यफुलाच्या भावात १५० रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे
.नॉन-राजपत्रित ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉइंट्समन, मंत्री कर्मचारी आणि इतर ‘क’ गट कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा मिळेल. तर यामध्ये आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांचा समावेश होत नाही.
रेल कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतील
रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या अंतर्गत पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांसाठी सुमारे १८,००० रुपये मानधन दिले जाईल. या निर्णयामुळे ट्रॅक मेंटेनन्स कर्मचारी, रेल्वे चालक किंवा लोको पायलट, ट्रेन मॅनेजर किंवा गार्ड, स्टेशन मास्टर्स, इन्स्पेक्टर, तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, पॉइंट्समन यांच्यासह गट ‘सी’ कर्मचाऱ्यांना फायदा होईल. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही बोनस केवळ ७८ दिवसांसाठी देण्यात आला होता आणि त्यावेळी १७,९५० रुपये देण्यात आले होते.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून वाढीव भत्त्यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए ४२% वरून ४६ टक्के झाला असून वाढीव भत्ता १ जुलैपासून लागू होईल. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वर्षातून दोनदा बदल करते.