औद्योगिक सांडपाण्याची माहिती द्या अन्यथा कारवाई; महापालिकेचा उद्योजकांना इशारा
सांडपाण्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उद्योजकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)
पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या उगमापासून संगमापर्यंत औद्योगिक कारणांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. औद्योगिक कारखान्यामधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उद्योजकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या वाहतात. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. शहर औद्योगिकनगरी असल्याने कारखान्यांची मोठी संख्या आहे. या कारखान्याचे औद्योगिक सांडपाणी काही प्रमाणात थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून यावर उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे. याचीच दखल घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही महापालिकेत बैठक घेतली होती.पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा अशा तीन नद्या वाहतात. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. शहर औद्योगिकनगरी असल्याने कारखान्यांची मोठी संख्या आहे. या कारखान्याचे औद्योगिक सांडपाणी काही प्रमाणात थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून यावर उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे. याचीच दखल घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही महापालिकेत बैठक घेतली होती.