maharastraमुंबई

जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन, चिठ्ठीही लिहिली!

मराठा आरक्षणासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या असल्या तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा लढा अधिक व्यापक झाला असून राज्यभरात या आंदोलनाचं लोण पसरलं आहे. मराठा आरक्षणप्रश्नी उपोषण करत असताना मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे सर्वत्र पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. अशातच राजधानी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे.

सुनिल कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी होते. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेले सुनिल कावळे हे जालन्याहून एकटेच मुबंईत आले होते. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. आत्महत्येच्या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.मराठा आरक्षणबाबत सरकारकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सुनिल कावळे यांनी आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.क्रूर सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नसल्यानेच हतबल होऊन समाजातील तरुण जीवन संपवत आहेत. मागच्या काही वर्षांत राज्याला चार मुख्यमंत्री मिळाले, मात्र आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. सरकारने समाजातील तरुणांच्या संयमाचा अंत न पाहता टिकणारं आरक्षण द्यावं. तरुणांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये,’ असं आवाहन विनोद पाटील यांनी केलं आहे.

  • मनोज जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचं षडयंत्र रचलं होतं, पण सरकारमधील लोकांचा डाव फसला: विनायक राऊत
  • मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल म्हणाले, पण मी ऐकले नाही; मराठा आरक्षणाशिवाय माघार नाही: मनोज जरांगे
  • Maratha Reservation: आरक्षण घोषणा १० दिवसांत करा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
  • Maratha Reservation: ओबीसींशी पंगा, धनगर आणि मुस्लिमांना सोबत घेण्याची मनोज जरांगेची योजना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button