maharastra

Chhagan Bhujbal : कंत्राटी भरतीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले, तो विषय आता.

नाशिक | 21 ऑक्टोबर 2023 : कंत्राट भरतीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.

या मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे सरकारला घेरण्यात येतंय. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी यावर काही बोलणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. यापुढे कंत्राटी भरती करणार नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यालाही छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. माझं नाव घेतलं की नाही माहिती नाही. माझा काही संबंध नाही. त्या फॅक्टीमध्ये जे काही बनत होतं. ते सर्वसामान्यांना माहिती नव्हतं. याची चौकशी व्हायला पाहिजे. यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही, असं छगन भुजबळ म्हणालेत.

कुणी 16 लाख कुणी 16 कोटी काहीही म्हणेल याला काही अर्थ नाही. काही लोक म्हणतात, छगन भुजबळ यांच्याकडे 6 हजार कोटींची मालमत्ता आहे…. तर घेऊन जा… मला फक्त 500 कोटी द्या… सर्व मालमत्ता घेऊन जा. हे लोक प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात. नसते आरोप करतात, असं म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

ललित पाटील हा कोणत्या पक्षात होता? पोलिसांनी शेवटच्या पातळीपर्यंत शोध घेतला पाहिजे. जगात कुठे कुठे ड्रग्स जात होतं. याची माहिती घेऊन साखळी तोडली पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक जयदत्त होळकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडल आहे. त्यावर बोलताना प्रत्येकाची वेगवगळी कारणं असतात. दाखवायला एक कारण असतं. खरं कारण दुसरंच असतं. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. तिथे काही उमेदवार निवडून आलेत मग आपले काय होणार याची काळजी असते. भुजबळ शिवसेना, भाजप यांच्याबरोबर अजित पवार गटात काम करतात. आपलं पुढे काय होणार याची काळजी अनेकांना असते. आता येवला लासलगावची जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करत राहणार, असंही छगन भुजबळ म्हणालेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button