गुन्हेगारी

विज तारा चोरणारी ११ जणांची टोळी जेरबंद, ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला: जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात अनेक महिन्यांपासून विज तारा चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. वाढत्या घटना लक्षात घेता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले.

त्यानुसार एलसीबी प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी दाेन पथके तयार करून शोध सुरू केला. दरम्यान पोलिसांनी २१ ऑक्टोबर राेजी विज तारा चोरणाऱ्या ११ जणांच्या टोळीला जेरबंद करून सुमारे ९ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीच्या पथकाला फुकटपुरा अकोला येथील बासीर खान निसार खान याने चोरीच्या विज तारांची विक्री केल्याची माहिती मिळाली.

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती व तांत्रिक माहितीनुसार विद्युत तारांच्या चोरी बाबत काही संशयीत नावे निष्पन्न झाली होती. यामध्ये बाळापूर, तालुक्यातील, कोळासा, मांडोली या भागातील काही व्यक्ती होते. पोलिसांनी उमेश गुलाब सोळंके(३५), रा. ग्राम कोळासा, निलेश प्रकाश अंभोरे(३५) रा. बिंबोरी गणु ह.मु ग्राम कोळासा, सचिन उर्फ डि.जे रामराव वानखडे(२३) रा. मांडोली, ता. बाळापूर, मिलिंद गजानन डाबेराव(२६) रा. ग्राम कोळासा यांना चौकशीकामी ताब्यात घेतले होते.चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी बाळापूर तालुक्यातील पारस व परिसरात रात्रीच्या वेळी त्या भागातील पोल वरील ॲल्युमीलीयम विद्युत तार कापून त्याची चोरी करून अकोल्यात विकल्याचे सांगितले.

तसेच सुरज भिमराव सिरसाठ(२७) रा. ग्राम कोळासा, प्रदिप गुलाबराव वानखडे(२६) रा. ग्राम कोळासा यांचीही नावे सांगितली. सोबतच पोलिसांनी विद्युत तार चोरीतील आणखी आरोपी बासीर खान निसार खान(२३) रा. फुकट पुरा, शेख इमरान गुलाम नबी(३३) रा. खैर मोहम्मद प्लॉट नेहरू नगर, अकोला, नईम खान नासीर खान(३०) रा. गुलजार पुरा, गुलाम सादीक गुलाम दस्तगीर(३८) रा. खैर मोहम्मद प्लॉट, सैयद वजीर सैयद नजीर(२७) रा. खैर मोहम्मद प्लॉट अकोला यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी १५ गुन्ह्यांनी कबुली दिली आहे.

तिघांनी केल्या चोरीच्या तारा खरेदी
अकोला येथील भंगार व्यवसायिक मोहम्मंद शहजाद मोहम्मद ईस्लामोदद्दीन(३२) रा. हाजीपूरा सस्थट जि. मुजफ्फर नगर उत्तर प्रदेश ह. मु. वाशिम बायपास अकोला व मोहम्मद वसीम मोहम्मंद फारूख(३०) रा. हाजीपूरा सरवट जि. मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश ह.मु, वाशिम बायपास अकोला, आरिफ मलीक अखतर मलीक(२३) रा. मेरठ लकीपुरा गल्ली नं २३ मेरठ ह. मु. सुभाष चौक अकोला यांना विज तारा विकल्याचे सांगितले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एलसीबी प्रमुख शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पीएसआय गोपाल जाधव, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, सुलतान पठान, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, अब्दुल माजीद यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button