लग्नाचे अमिश देऊन भुसावळच्या तरुणीवर चार महिने अत्याचार
जळगाव । २२ ऑक्टोबर २०२३ । लग्नाचे अमिश दाखवून भुसावळच्या तरुणीवर चार महिने अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, उमेश शेख मोहसीन शेख (25, ताज नगर, भुसावळ) असं संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत असं की 23 वर्षीय पीडीता शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. संशयित उमेश शेख मोहसीन शेख सोबत तिची ओळख झाल्यानंतर संशयिताने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले व 7 नोव्हेंबर 2022 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान संशयिताच्या घरी तिच्यावर अत्याचार केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने शनिवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.