22 ऑक्टोबर 2023 : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. राशिद खान यांनी आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटिस बजावली आहे. आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा न्यायालीयन प्रक्रियेला सामोरे जावं, असं या याचिकेतून बजावण्यात आलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राशिद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यानुसार त्यांनी आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी. वृत्तपत्रातून त्यांना माफीनामा द्यावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना सीबीआयने ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांचं कॅव्हेट
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर कोर्टात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सायन यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान मागील सुनावणीत आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी कॅव्हेट दाखल केलं होतं. कोर्टाने कोणतेही निर्देश देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटमधून आदित्य ठाकरे यांनी केली आहे.