गुन्हेगारीमुंबई

Mumbai Crime: साहेबांच्या गाडीसह १ कोटी घेऊन चालक फरार, मोबईल फेकला, लोकेशन बदललं, पण…

Mumbai Crime News: ज्याच्यासाठी काम करत होता त्याचेच पैसे घेऊन पळालेल्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा चालक तब्बल १ कोटी रुपये घेऊन फरार झाला होता.

मुंबई: १७ वर्षांपासून विकासकासाठी काम करणाऱ्या चालकाला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. हा चालक त्याच्या मालकाचे १.०६ कोटी रुपये घेऊन पळून गेला होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संतोष चव्हाण याने आपला मोबाईल फोन बंद केला होता, तर लोकेशन कळू नये म्हणून तो वेगवेगळी वाहनंही बदलत होता. त्यामुळे तो सीसीटीव्हीपासूनही वाचत राहिला.चोरीला गेलेली बहुतांश रोकड जप्त करण्यात आली

ही चोरी ११ ऑक्टोबर रोजी झाली होती. विकासक सरकारी कार्यालयात जात होता आणि त्याच्या कारच्या बूटमध्ये २५ लाख रुपये ठेवले होते. त्यांनी चव्हाणला पैशांबाबत सांगितले आणि गाडीत बसण्यास सांगितले. मात्र, अर्ध्या तासाने ते परत आले असता चव्हाण रोख रक्कम आणि कार घेऊन गायब झाला होता. त्याचा फोन बंद होता. चव्हाण यांनी बिल्डरच्या कार्यालयातून आणखी ७५ लाख रुपयांची चोरी केल्याचंही पोलिसांनी सांगितले.कार घेऊन फरार झाल्यानंतर चव्हाणने जोगेश्वरी येथे कार सोडली आणि ऑटोरिक्षा केली. तेथून तो हब मॉल, गोरेगाव येथे गेला, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते.

पोलिसांच्या पथकाने त्याच्या घणसोलीतील घरी भेट दिली, मात्र तो तिथे नव्हता. तपासात पोलिसांना कळाले की, त्याच्या पत्नीने त्याच्या मुलाला शाळेतून लवकर घेतले होते. तसेच, त्याच्या मोबाईल नंबरचा वापर करून कोणतेही कॉल केले गेले नव्हते, त्यामुळे त्याने तो बंद करुन मोबाईल टाकून दिल्याचं समजते, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.चव्हाणच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळले की त्याची एक जवळची महिला मैत्रिण आहे. तिचे मेहुणे प्रदीप यादव यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की चव्हाण यांनी एक कोटी रुपये मोजण्यासाठी त्यांची मदत मागितली होती. चव्हाणने यादव यांना नवीन फोन आणि सिमकार्ड विकत आणण्यास सांगितले होते. यादव यांच्या नावाने नोंदणीकृत फोन त्याने वापरला. त्याने यादवला कार भाड्याने आणून आळंदीला नेले, जेथे तो एका गेस्ट हाऊसमध्ये राहिला. चव्हाण यांनी गेस्ट हाऊसमध्ये चेक इन करण्यासाठी यादवच्या आधार कार्डचा वापर केला होते, जेणेकरुन त्याचा कुठलाही सुगावा लागू नये. आळंदी येथे नातेवाइकाकडे ५० लाख रुपये ठेवून ते अकोल्याला गेले, असं एका तपासकर्त्याने सांगितले.अकोला येथे त्याला चुलत भावाकडे काही रोख रक्कम ठेवायची होती. मात्र, भावाने ते पैसे ठेवण्यास नकार दिला. अखेर चव्हाणला ३६ लाख रुपयांसह अटक करण्यात आली. पोलिसांनी अमित शिंगटे या ऑटोचालकाचाही शोध घेतला, ज्याच्याकडे चव्हाणने १० लाख रुपये ठेवले होते. चव्हाणच्या सूचनेवरून शिंगटे यांनी दोन सहकारी पतसंस्थांमध्ये १.३ लाख रुपये जमा केले होते. डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली त्याला पकडण्यात आले, असे वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button