मुंबईसत्ताकारण

संजय राऊतांचा हल्लाबोल मुख्यमंत्री केवळ भाजप दिलेला शब्द पाळतात, मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत;

23 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप आणि बिल्डरला दिलेला शब्द पाळतात. समाजाला दिलेला शब्द पाळत नाहीत. एकदा जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटा. कायद्यात दुरुस्ती करा. त्यांना तसं सांगा. ते तुमचे लाडके आहात ना? मग त्यांना आरक्षण द्यायला सांगा. मनोज जरांगे पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जा आणि कायद्यात दुरुस्ती केलेलं प्रमाणपत्र घेऊन यावं, असं म्हणतखासदार संजय राऊतयांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जे तरूण आत्महत्या करत आहेत. ती मराठी मुलं आहेत. आज तिसरी आत्महत्या झाली. त्यांचं असं आत्महत्या करणं पाहावत नाही. सरकारला आरक्षण द्यायचे की नाही हे स्वतः मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे अजितदादा पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. उद्या मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपत आहे. तीन आत्महत्या झाल्या. पण सरकारच्या डोळ्यांची पापणी देखील हलत नाही. हे निर्दयीपणाचं लक्षण आहे, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

मराठा मतांसाठी भाजपने मराठ्यांचा चेहरा म्हणून तुम्हाला बसवलं आहे ना? सरकार जाहिराती करत आहे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ यासाठी तुम्हाला बसवलं नाही. तुमच्या सरकारमधील काही लोक हे वेगळ्या दिशेने चालले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी या राज्यामध्ये वातावरण बिघडू शकतं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ हुलकावण्या देत आहेत. लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातील काही स्वतःला मराठा समजणारे काही 96 कुळी नेते आहेत. ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही, आम्हाला कोणी सर्टिफिकेट नको, म्हणत आहेत. दिल्लीत केंद्रातील नेत्यांची भाषा वेगळी आहे. या आंदोलनामध्ये फूट पाडण्याची सधन मराठ्यांनी रणनीती आखली आहे का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. दुर्बल मराठा समाजासाठीचा लढा मनोज जरांगे पाटील यांचा आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभीर्याने पाहावं, असं आवाहनही संजय राऊत यांनी शिंदे सरकारला केलं आहे.

जर चौथी आत्महत्या झाली. तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवादाचा एफआयआर दाखल करावा, असंही राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button