मुंबई

मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी, रितेशचं ट्विट व्हायरल, म्हणाला मराठा समाजातल्या…

Riteish Deshmukh Tweet:मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनासंदर्भात अभिनेता रितेश देशमुखनं केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.

  • Riteish Deshmukh Tweet:मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनासंदर्भात अभिनेता रितेश देशमुखनं केलेलं ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.काय आहे रितेश देशमुखचं ट्विट?
    जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.

    रितेशन हे ट्विट केल्यानंतर यावर आता नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. रितेशनं मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला जरांगे यांची प्रत्यक्षात भेट घे…असा सल्लाही दिला आहे.दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीनं दाखले दिले जातील. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी नव्यानं प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.मनोज जरांगे पाटील यांचा विरोध
    ज्यांच्याकडं कुणबी वंशावळी असतील किंवा तसे पुरावे असतील त्यांना कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिल्यानंतर फक्त पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार असल्याचं सांगत सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्यावेत, असा पुनरुच्चार करत अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.जरांगे यांनी वेळ द्यावा

    जरांगे पाटील यांना विनंती आहे की, तुम्ही सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत, पाणी प्यायलं पाहिजे. सरकारला मनोज जरांगे यांची चिंता आहे. त्यांचा लढा सरकारनं गांभीर्यानं घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button