मुंबई पोलिसांकडून वर्षभरात साडेचारशे कोटींचे एमडी जप्त; नाशिक, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये कारखाने उद्ध्वस्त
अमलीपदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत साडेचार हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे.
मुंबई : नववर्षांच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या रेव्ह पाटर्यांवर करडी नजर असलेल्या मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे चारशे कोटींहून अधिक किमतीचे मेफ्रेडन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे चार हजार ८०० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट केले आहेत.
यावर्षी मुंबई पोलिसांनी नाशिक व सोलापूर येथील एमडी या अमलीपदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत साडेचार हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे. या कारवाईत नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूर व गुजरातमधील दोन एमडी निर्मिती करणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या वर्षांतही सर्वाधिक म्हणजे ४०५ कोटी ५५ लाख रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले आहे. २०२३ मध्ये १३१९ गुन्ह्यांमध्ये एकूण ४३७ कोटी ९८ लाखांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्या प्रकरणी १७१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभर कारवाई करून साडेसात कोटी रुपयांचा गांजा, ५० लाखांचे कोकेन, १० कोटींचे चरस, चार कोटी २१ लाखांचे हेरॉईन, ५८ लाखांचे एलएसडी, सात कोटी ८७ लाखांचे केटामाईन, सहा लाख रुपयांच्या प्रतिबंधित अल्प्राझोलम गोळया जप्त केल्या आहेत. तरुण व्यसनाधीन
मेफ्रेडॉनमुळे (एमडी) ‘झिरो’ फिगर मिळते व ऊर्जा मिळते, असा अपप्रचार आहे, त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व तासनतास नाचण्यासाठी बारबाला एमडीचा वापर करत आहेत. पान मसाल्यात मिळवून बारबाला एमडीचे सेवन करत आहेत. याशिवाय महाविद्यालयातील तरुण पिढीलाही जाळयात ओढण्यासाठी एमडीमुळे झोप येत नाही, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता, एमडीमुळे त्वचा सतेज राहते, असे पसरवण्यात येते. या भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. त्यातील सुंदर मुलींना हेरून विक्रेते त्यांना मोफत एमडी पुरवतात. चार-पाच वेळा सेवन केल्यानंतर त्याचे व्यसन लागते. मग विक्रेते त्यांना या अमलीपदार्थ विक्रीत गुंतवतात. त्यामुळ पोलिसांनी विशेष कारवाया करून एमडी जप्त केले आहे.
’४७६० किलो २०२३मध्ये नष्ट ४८९६ कोटी नष्ट केलेल्या अमलीपदार्थाची किंमत ’४८५६ कोटी जूनमध्ये नष्ट केलेल्या अमली पदार्थाची किंमत