maharastra

14 तासांतच पोलिसांनी केली सुटका,दारुड्या बापानं पोटच्या तीन वर्षाच्या मुलाला विकलं.

अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे,कतारमधील एका व्यक्तीला हे बाळ सोपवण्यात येणार होतं.

 (जि. यवतमाळ) : तीन वर्षीय बाळाची अडीच लाखांत विक्री केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ठाणेदार केशव ठाकरे यांनी चौदा तासांच्या तपासात पाच आरोपींना शुक्रवारीच (ता.पाच) अटक केली. एका पसार आरोपीच्या मागावर पोलिस आहेत. दरम्यान पोलिसांनी बाल न्याय मंडळ यवतमाळ येथे या बाळाला सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिले. तालुक्यातील कोपरा येथील एका २७ वर्षीय महिलेनं आपला दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून आपलं तीन वर्षाचं बाळ नवऱ्याकडं ठेवून देवळी (ता. वर्धा) इथं मोठ्या बहिणीकडे एका महिन्यापूर्वी गेली होती. बहिणीकडे पुष्पाला माहिती मिळाली की, तिच्या बाळाची तिच्या नवऱ्याने परराज्यात विक्री केली. त्यावरून तिने गुरुवारी (ता.चार) आर्णी पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी तपासाची चक्र तातडीनं फिरवली

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवित महिलेचा पती त्याचे साथीदार चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडंबे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेलंगणातून अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव बोल्ली गंगाराजू गंगाराम (वय ४५, रा. मोहनराव पेठ, ता. कोर्टुला, जि. जगतीयाल) असं आहे. या शिवाय या प्रकरणात मुलाच्या बापासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार केशव ठाकरे, जमादार मनोज चव्हाण, आकाश गावंडे, जया काळे यांनी पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.आदिलाबाद येथे अडीच लाखांत मुलाची विक्री केल्याचे कळलं. आदिलाबाद येथील एजंट अरविंद उस्केमवार याला ताब्यात घेऊन बाळासंबंधित चौकशी केली असता ते बाळ तेलंगणा राज्यात एका महिलेकडं असल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे संबंधित महिलेला ताब्यात घेऊन बाळालाही आपल्याकडे घेतलं आणि रातोरात पुन्हा आर्णीकडं निघाले.तेलंगाणात ज्या महिलेकडून पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतलं. ती महिला या बाळाला मूळ कतार इथं राहणाऱ्या एका व्यक्तीला विकणार होती, प्राथमिक तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button