Uncategorized

“भारताच्या सहभागाचा पुरावा काय?” कॅनडाच्या आरोपांवर न्यूझीलंडचं प्रश्नचिन्ह!निज्जर हत्या प्रकरण

काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील गुप्त माहिती फाइव्ह आईज देशांबरोबर शेअर करण्यात आल्याचे वृत्त होते. याच पार्श्वभूमीवर त्यांना कॅनडाच्या भारतावरील आरोपांसंदर्भात विचारण्यात आलं होतं.

खलिस्तान समर्थक दहशतवादी म्हणून भारतीय तपास यंत्रणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या हरदीपसिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यांच्या आरोपांवर आता न्यूझीलंडचे उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा पुरावा काय? अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.विन्स्टन पीटर्स हे सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी नुकताच द इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांना निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी याप्रकरणात भारताचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.

खरं तर काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील गुप्त माहिती फाइव्ह आईज देशांबरोबर शेअर करण्यात आल्याचे वृत्त होते. याच पार्श्वभूमीवर त्यांना कॅनडाकडून भारतावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भातील पुरावे न्यूझीलंडबरोबर शेअर करण्यात आले आहेत का? आणि याबाबत न्यूझीलंडची भूमिका काय? अशा प्रश्न विचारला विचारण्यात आला होता.यासंदर्भात बोलताना, ”ज्यावेळी हे प्रकरण घडलं, त्यावेळी न्यूझीलंडमध्ये आम्ही सत्तेत नव्हतो. आम्ही आता सत्तेत आहोत. मात्र, तुम्ही विरोधात असलात, तरी तुम्ही फाईव्ह आईज देशांबरोबर शेअर करण्यात आलेल्या माहितीबाबत ऐकत असता, पण ती माहिती किती कामाची आहे? त्या याबाबत तुम्हाला कल्पना नसते. दरम्यान, सत्तेत आल्यानंतर एक वकील म्हणून मी याप्रकरणाचा अभ्यास केला. तेव्हा मला याप्रकरणी कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विशेष म्हणजे फाइव्ह आईज गटातील सदस्य देशानेच कॅनडाच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्थरावर आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, फाइव्ह आईज हा पाच देशांचा एक गट असून यामध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. हे पाचही देश एकमेकांबरोबर गुप्त माहिती शेअर करतात.जून महिन्यात व्हँकोव्हरमध्ये एका पार्किंग स्लॉटमध्ये दोन अज्ञात हल्लेखोरानी हरदीप सिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्या प्रकरणात भारतीय अधिकाऱ्यांच्या सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. त्यांच्या आरोपांनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button