ठाण्यातील प्रमुख नेत्याने केला मोठा दावा,नरेश म्हस्के मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील;
नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाणे : महायुतीने ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालं आहे. ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात थेट लढाई होणार आहे. महायुतीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नरेश म्हस्के मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील, असा मोठा दावा अविनाश दावा केला आहे.मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार देखील सुरु केला आहे. त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे.
यावर भाष्य करताना अविनाश जाधव म्हणाले,’सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी याठिकाणी यायला हवं. आमचा आनंद तुम्हाला निवडणुकीत दिसेल. महायुतीचं सरकार यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे’.’राजन विचारे यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ पहिला, तर आता फूट पडल्यानंतर 2 वर्षात दिसायला लागले. त्याआधी 8 वर्ष दिसत नव्हते. मनसेचे ठाण्यात 2 लाख मत आहे. मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश म्हस्के निवडून येतील. पालघरच्या बाबतीत लवकर निर्णय झालं पाहिजे होता. तुम्ही किती वर्ष प्रचार करत आहात हे महत्वाचं नाही. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवार म्हणून आधीच फोटो टाकलेला आहे. ठाणे, पालघर, कल्याण, अशा चारही ठिकाणी महायुतीचा उमेदवार निश्चित होईल, असेही अविनाश जाधव पुढे म्हणाले.याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले, ‘ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय पक्का आहे. राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येतील, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. राजन विचारे यांचा प्रचार जरी आधीच सुरु झाला असला, तरी विजय म्हस्केंचा होईल. ठाणे जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणून येतील, असाही दावा त्यांनी केला.