ठाणे

कल्याणमध्ये रिक्षा पार्किंगवरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू

सोसायटीमधील दुकानासमोर रिक्षा उभी करत असल्याने रिक्षा चालक आणि इसमामध्ये वाद झाला. संतापलेल्या रिक्षा चालकाने आपल्या साथीदारांसह या रिक्षा पार्किंग करण्यास विरोध करणाऱ्या इसमाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या इसमाचा मृत्यू झाला होता. संदेश घाडसी, असे मृत्यू झालेल्या इसमाचा नाव आहे.या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मारहाण करणाऱ्या नरेंद्र आडविलकर, विनय ताम्हणकर, असे आरोपींचे नाव आहे. पोलिसांच्या चांगल्या तपासामुळे आरोपींना शिक्षा मिळाली आहे. प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी विविध कलमातंर्गत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील काकाच्या ढाबा परिसरात एका सोसायटीमधील दुकानासमोर एक रिक्षा चालक नरेंद्र आडविलकर हा रिक्षा उभी करायचा. आडविलकर याला संदेश घाडसी यांनी रिक्षा उभी करु नका. त्यामुळे लोकांना त्रास होतो, असे सांगितले होते. परंतू आडविलकर काही ही ऐकण्याच्या मनस्थीत नसल्याने १८ मार्च २०१९ मध्ये नरेंद्र आडविलकर आणि संदेश घाडसी यांच्यात वाद झाला.या वादानंतर संदेश घाडसी यांना नरेंद्र आडविलकर , विवेक ताम्हणकर आणि अन्य तीन जणांनी मारहाण केल्याचा आरोप झाला. नरेंद्र आडविलकर विवेक ताम्हणक यांनी संदेश यांचा गळा आवळला होता. त्यामुळे संदेशचा मृत्यू झाला. कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक एम एस भोगे हे करीत होते. पाच वर्षापासून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुुरु होती.पत्नी आणि काही लोकांनी या प्रकरणात न्यायालयासमोर साक्ष दिली होती. अखेर या प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी विविध कलमातंर्गत दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये नरेंद्र आडविलकर आणि विवेक ताम्हणकर यांचा समावेश आहे. अन्य तीन आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पेलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. पोलिासांच्या चांगल्या तपासामुळे कुटुंबियांना न्याय मिळाला तर आरोपींना शिक्षा झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button