बजरंग दल चे कार्यकर्ता अरविन्द वैश्य ची धारावी मध्ये हत्या……
पोलीस स्टेशनवरुन तक्रार दाखल करुन घटनास्थळी येत असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. पोलीस पोहोचण्याआधीच त्याच्यावर वार करण्यात आले होते.
मुंबई: धारावीत अरविंद वैश्य या तरुणाची रविवारी हत्या झाली होती. सांप्रदायिक तणावातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी अरविंदच्या हत्येनंतर धारावी परीसरात मोठमोठी होर्डिंग लावण्यात आली असून त्यात “व्यर्थ न जायेगा बलिदान” असा मजकूर टाकण्यात आला आहे. यातूनच वादाची ठिणगी पेटली आहे. धारावी परिसरात हिंदु आणि अल्पसंख्याक समजाची मोठी वस्ती आहे. यामुळे धारावी मध्ये कालपासून तणावाच वातावरण निर्माण झालं.अरविंद हा बजरंग दलाचा पदाधिकारी होता आणि गेल्या वर्षापासून हिंदुत्ववादी विचाराला प्रेरित होऊन काम करत होता.धारावीच्या राजीव नगर भागात रविवारी रात्री दोन गटांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडवायला गेल्यानंतर अरविंद वैश्यची हत्या करण्यात आली. अरविंदचा भाऊ शैलेंद्र याने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी ७वाजण्याच्या सुमारास अल्लू,आरिफ,शुभम आणि शेर अली यांचं सिद्धेशसोबत भांडण सुरू होतं. हे भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारायला सुरूवात केली. हे भांडण सोडवायला अरविंद तिकडे गेला,तेव्हा अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदला मारहाण केली.आज अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेत हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
भाजप नेत्याकडून कठोर शिक्षेची मागणी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, धारावीतील ही दगडफेक ड्रग माफियांनी केली होती. “मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवावी आणि संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी.
अरविंदचा भाऊ शैलेंद्र कुमार वैश्य यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही आमदार राम कदम यांनी केली आहे.