क्रीडा

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अंतिम फेरीत; ८९.३४ अंतरावर खणखणीत थ्रो, पाहा

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा पहिला थ्रो ८९.३४ मीटर अंतरावर फेकला गेला. ही त्याचा या मोसमातील सर्वोत्तम थ्रो आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी, खेळाडूंना ८४ मीटरचा टप्पा पार करायचा होता. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ अंतरावर थ्रो केला होता. जेव्हा त्याने सुवर्णपदक पटकावले.पात्रता फेरीत नीरजने भालाफेकमध्ये पहिल्या क्रमांकावर थ्रो करण्यासाठी आला होता. नीरजने पहिल्याच थ्रोमध्ये ८९.३४ मीटरचा थ्रो करून सर्व भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटवली. अशाप्रकारे भारताचा गोल्डन बॉयची आता अंतिम फेरीत आपल्या सुवर्णपदकावर पुन्हा एकदा नजर असणार आहे. नीरजचा हा थ्रोही त्याच्या मोसमातील सर्वोत्तम ठरला. याशिवाय तो त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोच्याही जवळ आला. आता नीरज चोप्रा अंतिम फेरीत ९० मीटरचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न करेल आणि भारताला सुवर्णपदक मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.नीरजशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याने ८६.५९ मीटर फेक केली, जी त्याची हंगामातील सर्वोत्तम थ्रो होती. आता अंतिम फेरीत त्याचा सामना भारताच्या नीरजशी होणार आहे. दुसरीकडे, नीरज चोप्राचा सहकारी किशोर जेना ग्रुप-ए मध्ये होता. त्याने ८०.७३ मीटर थ्रो केला आणि तो त्याच्या गटात ९व्या स्थानावर राहिला. तो अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नीरज चोप्रा पहिल्या फेरीत अव्वल ठरला.नीरज चोप्रासाठी अंतिम फेरीत सुवर्णपदकाचा बचाव करणे अजिबात सोपे असणार नाही. अंतिम फेरीत त्याचा सामना अ गटातून पात्र ठरलेल्या ज्युलियन बेव्हरसारख्या बलाढ्य खेळाडूशी होईल. त्याने पात्रता फेरीत ८७.७६ मीटर थ्रो केला. अ गटात, ज्युलियन बेव्हर व्यतिरिक्त, ज्युलियस येगोने ८५.९७ मीटर थ्रो केला आणि दुसरे स्थान मिळवून पात्र ठरला. ८५.६३ मीटर अंतरावर भाला फेकणारा वाल्देझ जेकब तिसरा होता. याशिवाय टोनी केराननने ८५.२७ मीटर थ्रो करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button