विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; तणावाचे वातावरण, पोलिसांकडून मध्यरात्री लाठीमार-भिवंडी
गणेश विसर्जन मिरवणूकीत रात्री दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी रात्री उशीरा जमाववर लाठीमार केला. काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. आज, बुधवारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गेल्याकाही दिवसांपासून भिवंडीचे वातावरण दुषित करण्याचे कार्य समाजकंटकांडून सुरू झाले आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे.भिवंडी येथून रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक वंजारपट्टी नाका परिसरात आली असता, अचानक दगडफेक झाली. या घटनेनंतर या भागात मोठ्याप्रमाणात गर्दी झाली. घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू झाली. काहीवेळानंतर मोठ्याप्रमाणात जमाव याठिकाणी निर्माण झाला. तसेच काही वाहनांची तोडफोडही झाली. अखेर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. जमावातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे. आज ठाणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त शहरात ठेवला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून भिवंडीत काही समाजकंटकांकडून भिवंडीतील सामाजिक वातावरण बिघडविण्याचे कार्य सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.