धारावीत ‘ती’ अनधिकृत मशिद हटवण्याचे काम सुरू
न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई: सुरूवातीला महापालिकेकडून मस्जिद हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. अनधिकृत मस्जिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायायलयाच्या आदेशानंतर ट्रस्टने मस्जिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहेविशेष म्हणजे मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मस्जिद60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या मस्जिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही मस्जिद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस 2 मजले होते. पावसाचे पाणी या मस्जिदीत शिरायचे आणि त्यामुळे मशिदीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य आले आहे. हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे ते म्हणाले होते. यापूर्वीही न्यायालयाने बेकायदा बांधकाम हटविण्यास सांगितले होते. त्यावेळीही बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी बीएमसी आली होती, त्यानंतर ईदनंतर बेकायदा बांधकाम हटवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर बीएमसीचे पथक तेथे गेले. बीएमसी आल्यावर मस्जिद कमिटीने सांगितले की त्यांना ४ ते ५ दिवसांचा अवधी हवा आहे, त्या दरम्यान ते स्वतः बेकायदा बांधकाम हटवतील, त्यामुळे बीएमसीची टीम परतली.राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मला विश्वास आहे की मस्जिद समितीने बीएमसीला ज्या प्रकारे आश्वासन दिले आहे, त्याच पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल.