गुन्हे शाखा युनिट पाच ची मोठी कामगिरी,नेपाळी चोरटा दागिने विक्रीसाठी आला अन् ….
पुणे:गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी साडे आकरा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. अनिल मिनसिंग खडका (वय २५, रा. माळवाडी हडपसर, मुळ.नेपाळ) असे त्याचे नाव आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार अमित कांबळे आणि तानाजी देशमुख यांच्या पथकाने केली आहे.अनिल खडका याने २२ नोव्हेंबर रोजी हडपसर येथील मार्वेला आर्को या उच्चभ्रु सोसायटीत चोरी केली होती. तो मुळचा नागपूर येथील आहे.
तो जेष्ठ नागरिकांकडे केअर टेकर म्हणून काम करत होता. कामासाठी नेहमी उच्चभ्रु सोसायट्या हेरत असे. दरम्यान, काम करताना तो बंद फ्लॅटची रेकी करून ठेवत होता. संधी मिळताच कुलूप उचकटून तोडून चोरी करत असत.
त्याने २२ नोव्हेंबर रोजी हडपसर येथील मार्वेला आर्को सोसायटीत घरफोडी केली होती. याबाबत हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल होता.या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट पाचकडून समांतर तपास सुरू होता. तेव्हा पोलीस अंमलदार अमित कांबळे आणि तानाजी देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,
उच्चभ्रु सोसयाटीत घरफोडी करणारा चोरटा हा चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी माळवाडी येथील अक्षरधाम स्मशानभुमी परिसरात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून खडकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेली चौकशी आणि अंगझडतीत त्याने घरफोडी केल्याचे समोर आले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अनिल खडका नेपाळी असला तरी त्याचा जन्म पुण्यातच झालेला आहे. त्यामुळे त्याला पुण्याची सर्वच माहिती आहे. तो उच्चभ्रु अशा सोसायट्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा केअर टेकर म्हणून काम करतो. त्याचवेळी ज्येष्ठांना फेरफटका मारत असताना परिसरातील फ्लॅटची रेकी करत. त्यानंतर चोरी करत होता