मुंबई

ड्रग्ज, तंबाखू विरोधात मुंबईत रॅलीचे आयोजन,महाविद्यालयाच्या आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

. या रॅलीमध्ये शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचा उद्देश अंमली पदार्थांच्या सेवनाच्या धोक्यांबद्दल नागरिकांना शिक्षित करणे आणि निरोगी जिवनशैलीची निवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

मुंबई : ड्रग्ज, तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. क्रोनिक ब्राँकायटिस आणि एम्फिसीमा यांसारख्या फुफ्फुसांच्या आजारांचे मुख्य कारण धूम्रपान मानले जाते. दीर्घकाळ धूम्रपान केल्याने फुफ्फुस आणि श्वसनमार्गाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये जगभरातील कर्करोगाच्या मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू होतात. याचे मुख्य कारण म्हणजे अति धुम्रपान. या सगळ्या गोष्टींबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे.ड्रग्ज, तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत लोकांना सांगणं गरजेच आहे. हीच गोष्ट लक्षात घेत आता मुंबईत ड्रग्ज, तंबाखू सेवनाविरोधात रॅली आयोजित करण्यात आली होती. मुंबईत नशा बंदी मंडळातर्फे ड्रग्ज, तंबाखू सेवनाविरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ड्रग्ज, मद्य आणि तंबाखू न घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच ट्रांन्सजेंडर समुदायाचे सदस्य, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नशा बंदी मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचा उद्देश अंमली पदार्थांच्या सेवनाच्या धोक्यांबद्दल नागरिकांना शिक्षित करणे आणि निरोगी जिवनशैलीची निवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या मंडळींनी ड्रग्ज, तंबाखू सेवनाविरोधात बॅनर हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली. आपण जोपर्यंत वाईटाचे बीज नष्ट करत नाही तोपर्यंत ते आपला नाश करेल, अशी एक म्हण आहे. वाईटाची बीजे नष्ट करणे कठीण आहे पण अशक्य नाही, हाच विचार लक्षात घेत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तंबाखू, ड्रग्ज, अल्कोहोल आदींमुळे आरोग्यावर होणारे हानीकारक आणि वाईट परिणामांचे फलक आणि बॅनर हातात घेत रॅलीत सहभाग घेतला.तरुण पिढी अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडत आहे. तरुणांमध्ये दारू, सिगारेट, तंबाखू आणि इतर घातक अंमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. हे कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवे. ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती तरुणांना निराशेकडे नेऊ शकते, ह्याच उद्देशाने मुंबईत ड्रग्ज, तंबाखू सेवनाविरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. लोकांनी तंबाखूचे सेवन करू नये किंवा ते बंद करावे या घोषणेवर जोर देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button