शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याची जागा ठरली असून,शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
यंदा विधानसभा निवडणूका असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा रंगणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी तयारी सुरु केली असून शिंदे गटाकडून मैदान ठरवण्यात आले आहे.
मुंबई : यंदाचा दसरा हा जोरदार रंगणार आहे. कारण यंदा तीन जणांचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे दसऱ्याला राजकीय तुफान फटकेबाजी होणार हे तर स्पष्ट आहे. शिवसेनेमध्ये दसरा मेळाव्याची परंपरा सुरु असून आता शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात. शिवसेनेमध्ये बंडाचे राजकारण झाल्यापासून ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा असे दोन दसरा मेळावा होत असतात. आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले आहे.दसरा मेळावा हा राजकीय वर्तुळामध्ये महत्त्वाचा मानला जात आहे. शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडतो. मात्र आता दोन दसरा मेळावे झाल्यामुळे कोणत्या गटाला कोणते मैदान गाजवायला मिळते याची जोरदार चर्चा होते. बीकेसी मैदानावर यंदा शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरु आहे.शिवसेना पक्षासाठी दसरा मेळावा हा प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. 1966 साली पहिल्यांदा दसरा मेळावा झाल्यानंतर सातत्याने हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे. बंडाचे राजकारण झाल्यानंतर शिंदे गटामध्ये आणि ठाकरे गटामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद न्यायालयात पोहोचला होता. न्यायालयीन लढाईनंतर ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली होती. मागच्या वर्षी देखील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवाजी पार्कवर कोणाचा मेळावा होणार यावर राजकारण रंगले होते. त्यानंतर शिंदे गटाने अर्ज मागे घेत आझाद मैदानावर मेळावा घेतला होता. त्यानंतर या वर्षी शिंदे गटाचा तिसरा दसरा मेळावा होणार असून बीकेसीमध्ये शिंदे गटाचा मेळावा होणार आहे.बीकेसी मैदानावर शिंदे गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. यंदाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा तिसरा मेळावा असणार आहे. या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर 40 हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. शिंदे गटाचा पहिला दसरा मेळावा बीकेसीमध्ये झाला होता. त्यानंतर झालेला दुसरा मेळावा हा आझाद मैदानावर घेण्यात आला होता. त्यानंतर आता तिसरा दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून बीकेसी मैदान ठरवण्यात आली आहे. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था नीट असल्यामुळे बीकेसी मैदान हेच शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी ठरवले आहे.