रायगड

Raigad : इंजिनिअर तरुणीने गळफास घेत संपवली जीवयात्रा; परिसरात हळहळ

रायगडमधून एक भयानक घटना उडकीस आली आहे. महावितरणच्या इंजिनिअर तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली

 RAIGAD   –  रायगडमधून एक भयानक घटना उडकीस आली आहे. महावितरणच्या इंजिनिअर तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. अभिलाषा शेळके असे मृत तरुणीचे नाव आहे. अभिलाषा ही दक्षिण रायगडमधील गोरेगाव येथील महावितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होती.शुक्रवारी (१९ मे) सायंकाळच्या सुमारास अभिलाषाचा मृतदेह महावितरण (Mahavitaran) कंपनीच्या रहिवाशी वसाहतीमधील घरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अभिषालाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.मात्र, नेमकी तिने असं कठोर पाऊल का उचललं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पोलिसांनी अभिलाषाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button