माऊंट एव्हरेस्टची मोहीम फत्ते केल्यानंतर पुण्यातील पोलीस नाईक यांच्या प्रकृतीत बिघाड
दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (पुणे): पुणे पोलीस दलात दुसऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. नुकताच माउंट एव्हरेस्ट मोहिम सर केलेले पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस नाईक स्वप्नील गरड यांचा काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले, अशी माहिती पुणे पोलीस दलातील गरड यांच्या मित्रांनी दिली.
स्वप्नील गरड हे पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेले होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ते ब्रेन डेड झाल्याची माहिती त्यांच्या पुणे पोलीस दलातील मित्रांनी दिली. स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखरं सर केली होती. दरम्यान, स्वप्नील गरड यांनी गेल्यावर्षी जगातील सार्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम हे शिखर सरक केले होते. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेऊन नमन केले. त्यांच्या मृत्यूमुळे पुणे पोलीस दलाला मोठी खळबळ माजली आहे. ३१ मे रोजी पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले प्रकाश अनंत यादव यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे एक पाठोपाठ दुसरा पोलिसाचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जाते.