गुन्हेगारी

पोलिसांची मोठी कारवाई; कोयता गँग विसरा, आता पुण्यात दहशत माजवतेय चुहा गँग

पुणे : पोलिसांनी आता मोक्कामधील एका फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मोक्यामध्ये सहा महिन्यांपासून फरार असलेला चुहा गँगच्या मुख्य आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. सकिब मेहबूब चौधरी ( वय २३रा लुनिया बिल्डींग, चौथा मजला, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज, पुणे ) हा १६ फेब्रुवारीपासून सापडत नव्हता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा गुन्हा घडल्यापासून फरार कालावधीत तो त्याची ओळख लपवुन वारंवार वेगवेगळया जिल्हयांमध्ये त्यांची ओळख व ठावठिकाणा बदलून वास्तव्य करीत होता. त्याने त्यादरम्यान कात्रज आणि संतोषनगर परीसरात स्वत:च्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केले होते. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणावरून त्याला ताब्यात घेतले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पुरंदर तालुक्यातील निरा येथे जाऊन आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान याचा शोध घेतला असता तो त्यावेळी तो तिथे सापडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्हयाचे तपास अधिकारी नारायण शिरगावकर , सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांनी या आरोपीस अटक केली आहे. आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर यापूर्वी मोका कायदयांन्वये कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्हयातुन त्यास जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापीत करण्याकरता त्याच्या साथीदारांनी पुन्हा त्यांची टोळी तयार करुन त्याने गुन्हा केला आहे. आरोपी साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान हा त्याचे टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कात्रज भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वापर करुन त्यांचे टोळीची कात्रज भागात दहशत निर्माण करायचा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button