राष्ट्रीय

लवकरच ६६ रुपये लिटर इंधनात धावणार गाड्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

पेट्रोल-डीझल गाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी पारंपारिक इंधनाचे वाढते दर पाहून जगभरातील सरकारे इथेनॉल ब्लेंडेड फ्युअलवर काम करीत आहेत.

 नवी दिल्ली : नेहमीच नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी आणखी एक जोरदार घोषणा केली आहे. देशात १०० टक्के इथेनॉल  इंधनावर धावणारी वाहने येत्या ऑगस्ट महिन्यात लॉंच करण्यात येतील अशी घोषणा गडकरी यांनी एका मुलाखतीत केली आहे. हा निर्णय देशासाठी क्रांतीकारक ठरणार आहे. यामुळे आयात शुल्क, इंधनावरील खर्च आणि प्रदुषण कमी होणार आहे. तसेच संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून इथेनॉल इंधनावरील वाहनांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या भारतीय बाजारात इथेनॉलची किंमत ६६ रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे. आणि पेट्रोलची किंमत १०८ रुपयांच्या आसपास आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतीय रस्त्यावर स्वस्तातील इथेनॉलवरील दुचाकी आणि चारचाकी वाहने धावताना दिसणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे म्हटले की, ऑगस्ट महिन्यात १०० टक्के इथेनॉल इंधनावरील वाहने लॉंच करण्यात येतील, बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉल इंधनावर धावणारी मोटारसायकली तयार केल्या आहेत. टोयोटा कंपनीच्या ६० टक्के पेट्रोल आणि ४० टक्के वीजेवर चालणाऱ्या कॅमरी कारच्या धर्तीवरील वाहने देशात लॉंच केली जातील. जी ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीजेवर चालतील.

इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहल आहे. जे स्टार्च आणि साखरचे फर्मेंटेशन तयार होते. ऊसापासून साखर तयार करताना साखर कारखान्यात इथेनॉल तयार करता येते. त्यात पेट्रोल मिक्स करुन ते इको फ्रेंडली इंधनासारखे वापरले जाऊ शकते. इथेनॉल ऊसाच्या रसापासून होते. तसेच स्टार्च कॉन्टेनिंग मटेरियल्स सारखे मक्का, कुजवलेले बटाटे, भाजीपाला यापासून देखील इथेनॉल तयार करता येते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button