राष्ट्रीय

कॅलिफोर्निया विद्यापीठातून बेपत्ता,२३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी पोलीस म्हणाले, “आम्ही…”

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून नितीशा कंधुला ही २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहकार्य करावं असं आता तिच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ मेपासून ही मुलगी बेपत्ता झाली आहे. कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठात नितीशा शिकत होती, तिला लॉस एंजल्समध्ये शेवटचं पाहिलं गेलं.सीएसयूएसबीचे पोलीस अधिकारी जॉन गॉटिएरेज यांनी रविवारी एक्स पोस्ट करत सांगितलं की या मुलीला लॉस एंजल्समध्ये पाहिलं गेलं होतं. ३० मे रोजी ती बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. हा हॅशटॅगही त्यांनी सुरु केला आहे. कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठाचे सॅन बर्नार्डिनो पोलीसही यात आहेत. त्यांनी हे आवाहन केलं आहे की कुणाला नितीशा कंधुलाबाबत माहिती असेल तर ९०९ ५३७५१६५ या क्रमाकांवर आमच्याशी संपर्क साधा.नितीशाबाबत पोलिसांनी एक लेखी आवाहनही जारी केलं आहे. त्यात पोलिसांनी म्हटलं आहे, “नितीशा कंधुला ही २३ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता आहे. तिची उंची ५ फूट ६ इंच आहे, तिचे केस आणि डोळे काळे आहेत. तिचं वजन ७२.५ किलो आहे. कॅलिफोर्नियाचं लायसन्स असलेली टोयोटा कोरोला कार ती चालवत होती. पोलिसांनी या प्रकरणी ज्यांना माहिती असेल त्यांनी संपर्क साधावा असं सांगत 909 538 7777 हा क्रमांक पोस्ट केला आहे. याआधी पोलिसांना भारतीय विद्यार्थी रुपेश चंद्र हा शिकागोतून बेपत्ता झाल्याचीही माहिती मिळाली होती.याआधीच्या एका घटनेत भारतीय विद्यार्थ्याचा शोध सुरु होता. त्याचा मृतदेह पोलिसांना एप्रिल महिन्यात आढळून आला होता. या विद्यार्थ्याचं नाव मोहम्मद अब्दुल अरफात असं होतं. तो मूळचा हैदराबादचा होता आणि क्लेव्हलँड या ठिकाणी शिक्षण घेत होता. मात्र त्याचा मृतदेह आढळून आला. मार्च महिन्यात ३४ वर्षीय शास्त्रीय नर्तिक अमरनाथ घोश यांची गोळ्या झाडून हत्या झाली. तर फेब्रुवारी महिन्यात समीर कामत या २३ वर्षीय इंडो-अमेरिकन विद्यार्थ्याला ठार करण्यात आलं. या सगळ्या घटना घडत असतानाच आता आणखी एक भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे.नितीशा कंधुला ही मूळची हैदराबाद होती, ती कॅलिफोर्नियात शिकत होती. तिच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने तिचे कुटुंबीयही त्रस्त झाले आहेत. तिच्या जवळच्या नातेवाईकांनीही तिच्याबद्दल पोस्ट करत तिचा शोध घ्यावा अशी विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button