गुन्हेगारी

पोलिसांनी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या १२ सदस्ययी टोळीला पालघर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे विविध उपकरणे हस्तगत केली आहेत.

पालघर : पालघर शहर व जवळपासच्या भागात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या १२ सदस्ययी टोळीला पालघर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे विविध उपकरणे हस्तगत केली आहेत. या टोळीच्या दोन सूत्रधारांचा पोलीस शोध घेत असून पकडलेल्या इसमांवर यापूर्वी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे.

रात्रीची गस्त घालताना पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे यांनी पालघरच्या नवली फाटकाजवळ काही इसम दोन टेम्पोसह संशयितरित्या हालचाली करीत असल्याचे त्यांचा निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक यांनी याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला देऊन आणखी पोलीस कर्मचारी घटनास्थळी मागून घेतले. काही इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या व अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या इतर सर्वांना पोलीस यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पळालेल्या इसमांचा पाठलाग करून १२ जणांना पकडून ताब्यात घेतले. पकडलेल्या इसमांकडून दोन चार चाकी वाहन, लोखंडी कटर, लोखंडी धारदार कोयता, नायलॉन दोर, लोखंडी कटवणी, खिळे काढण्याची उपकरणे, वायर कापण्याचे कटर, मिरची पूड असे साहित्य हस्तगत केले आहे.

पालघरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी, पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय किंद्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली. या कारवाईमुळे नजीकच्या काळात दरोडासारखी मोठी घटना घडण्यापासून रोखण्यास पालघर पोलिसांना यश आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संबंधितांविरुद्ध आर्मस ऍक्ट व दरोडा घालण्याच्या तयारीच्या अनुषंगाने कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button