गुन्हेगारी

पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या जाळ्यात

नेरळ - बदलापूर रस्त्यावर पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी सापळा रचला. यानंतर...

उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने नेरळ – बदलापूर रस्त्यावर पुष्पा या चित्रपटाच्या स्टाईलप्रमाणे गांजाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या आरोपींनी इनोव्हा गाडीत वेगवेगळ्या ठिकाणी गांजा लपवून ठेवला होता. या कारवाईमध्ये तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरळ – बदलापूर रस्त्यावरून टोयोटा इनोव्हा या गाडीमध्ये काही जण लाखोंचा गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचचे शेखर भावेकर आणि राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, श्याम रसाळ, रमेश केंजळे, शेखर भावेकर, राजेंद्र थोरवे, चंद्रकांत पाटील, गणेश गावडे, चंद्रकांत सावंत, सतीश सपकाळे, संजय शेरमाळे या पथकाने सदर परिसरात सापळा रचला.

दरम्यान यावेळी एक इनोव्हा गाडी ही गाडी संशयस्पद पद्धतीने फिरताना पोलिसांना आढळली. त्यांनी तात्काळ गाडी अडवून गाडीची तपासणी केली असता त्या गाडीच्या विविध पार्टसमधून तब्बल ६१ किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामचंद्र शामराव शिंदे आणि विलास सीताराम वाघे या दोघांना अटक केली आहे. पुष्पा या चित्रपटात ज्या पद्धतीने चंदनाच्या लाकडांची तस्करी करण्यात येत होती. त्याच पद्धतीने हे आरोपी देखील गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button