गुन्हेगारी

गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरतंय कल्याणमधील कोळसेवाडी?, कल्याणमध्ये टोळक्याकडून तिघांवर हल्ला

कल्याणमध्ये गुन्हेगारी फोफावली आहे. खुलेआम गुन्हेगार दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. मात्र पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यास कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे.

कल्याण  :  चोरी, दरोडे, हल्ला, मारहाण, बलात्कार असा कोणता गुन्हा नाही जो कल्याण कोळसेवाडी परिसरात होत नाही. दररोज या घडणाऱ्या या घटनांमुळे कल्याण कोळसेवाडी परिसर गुन्हेगारीचं हॉटस्पॉट ठरतंय की काय असा प्रश्न पडला आहे. पुन्हा एकदा टोळक्याच्या मारहाणीची घटना कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. वाढती गुन्हेगारी पाहता आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. पत्नीसोबत रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीवर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पत्नीलाही टोळक्याने शिवीगाळ केली. यावेळी मदतीसाठी मध्ये पडलेल्या तरुणांनाही टोळक्याने सोडले नाही. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button