पुणे

अंमली पदार्थ विकणाऱ्या राजस्थानच्या युवकांना पुण्यातून अटक

राजस्थान येथून तस्करी करुन आणलेले मेफेड्रॉन (एमडी) अफू या अमली पदार्थांची हिंजवडीत आयटी पार्कमध्ये विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली.

पिंपरी : राजस्थान येथून तस्करी करुन आणलेले मेफेड्रॉन (एमडी) अफू या अमली पदार्थांची हिंजवडीत आयटी पार्कमध्ये विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ६१ मेफेड्रॉन, १ किलो ७०५ ग्रँम अफूचा चुरा असा ३ लाख ३९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविप्रकाश सुखराम बिष्णोई, सुरेशकुमार साईराम बिष्णोई (दोघे रा, फिलोदी, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांना अमली पदार्थ देणारा राजस्थानमधील साथीदार सोनू जालोरा आणि हिंजवडीतील साथीदार जयप्रकाश बिष्णोई यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरी काम करणारे तरुण, तरुणी कामाच्या ताणामुळे व्यसनांच्या विळख्यामध्ये सापडू नयेत, यासाठी जनजागृती; तसेच अमली पदार्थाच्या विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. मुंबई-बंगळुरु महामार्गावर बावधन येथे आरोप अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना सापळा रचला असता आरोपी कोणाची तरी वाट पाहत थांबले होते. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अमली पदार्थ सापडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button