गुन्हेगारीपुणे

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट‘या’ तिघांना पोलीस कोठडी; नेमकं काय घडतंय? वाचा

Lalit Patil Case Update Bhushan Patil Police custody : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट अपडेट समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याच्यासह तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात रोज नवे अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

 22 ऑक्टोबर 2023 : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी अरविंद लोहारेला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भूषण पाटील आणि अरविंद बालकवडेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पुण्यात या प्रकरणी सुनावणी झाली. तेव्हा ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी कोर्टात या प्रकरणी माहिती दिली आहे. चाकणच्या ड्रग्ज प्रकरणात अरविंद लोहारे अटके आहे. त्याला आता आज पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.अरविंद लोहारेने ललित पाटीलला कारागृहात मॅफेडरॉन बनवण्याची कंपनीच सेटअप करुन दिलं आहे. लोहारे हा एमएससी केमिस्ट्री झालेलं आहे. त्याने आतापर्यंत 10 केमिकल कंपन्यांमध्ये काम केलं आहे. महाडला पण त्याने स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. या तिघांची पोलिसांना समोर समोर चौकशी करायची आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

ड्रग्ज प्रकरणी ललित पाटील याची कसून चौकशी केली जात आहे. आज त्याला नाशिकला नेण्यात आलं होतं. त्याची तिथे चौकशी करण्यात आली. ड्रग्जमाफिया ललित पाटील याला मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे. ललित पाटील याच्या नाशिकमधील घराची मुंबई पोलिसांनी झाडाझडती घेतली. शिंदेगाव या ठिकाणी ड्रग्ज कारखान्याच्या जागेवर जाऊन मुंबई पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर त्याला शहापूर या ठिकाणी काही भागात देखील पोलिसांनी झाडाझडती घेऊन थेट मुंबई साकीनाका या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.

मुंबई पोलीसाची टीम आता ड्रॅग प्रकरणी ललित पाटील याची कसून चौकशी करत आहे. ज्या गाडीतून मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला तपास कामासाठी फिरवण्यात आलं. ती गाडी देखील साकीनाका पोलिस ठाण्याच्या आणण्यात आली आहे. या प्रकरणातील मोठे खुलासे लवकरच करणार असल्याचं ललित पाटील याने अटक झालेल्या दिवशी म्हटलं होतं. त्यामुळे तो आता कोणा कोणाची नावे आरोपी ललित पाटील घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button