माजी ग्राम पंचायत सदस्य फोनवर बोलत असताना पतीनं गोळ्या झाडल्या; बंदूक घेऊन पोलीस स्टेशन गाठलं
विवाहित महिलेची तिच्या पतीनेच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन
बंगळुरू : माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या विवाहित महिलेची तिच्या पतीनेच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीलाच त्याने संपवले आहे. ती सातत्याने कोण्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलत असल्याचे पतीने हेरले होते. याचाच राग डोक्यात ठेवून त्याने पत्नीला गोळ्या झाडून ठार केले आहे आणि यातच आश्चर्य म्हणजे पतीने पोलिसांसमोर जाऊन स्वत:च आत्मसमर्पण केले.पती बोपन्ना यांनी जबाबात म्हटल्यानुसार, शिल्पा यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्यांना समजले होते. शिल्पा ही शुक्रवारी कोण्या अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलत असल्याचे त्यांनी पाहिले आणि शनिवारी अशीच कोणाशी पुन्हा फोनवर बोलत असल्याचे त्याला राग अनावर झाला आणि बोपन्ना यांनी शिल्पावर रायफलने गोळ्या झाडल्या.पोलिसांच्या माहितीनुसार, बोपन्ना आणि शिल्पा यांच्या नात्यात काही तणाव निर्माण झाला होता. यामध्येच शिल्पा यांचे दुसऱ्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा बोपन्ना यांना संशय होता. यामुळे त्यांच्यात खटके उडत होते. याला कंटाळून शिल्पा यांनी विवाहबंधनातून मुक्त होण्याचे ठरवले आणि घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती.पत्नी पत्नी हे कोडागू जिल्ह्यातील बेतोली गावचे रहिवासी आहेत. शिल्पा सीताम्मा ही माजी ग्रामपंचायत सदस्य होती. २०१२ ते २०१७ या कार्यकाळात तिने ग्रामपंचायतीचे काम पाहिले. तर बोपन्नाचे सर्व्हिस सेंटर आहे यासोबतच त्यांची कॉफी इस्टेट देखील आहे. तर त्यांना दोन मुली असून एक दहावीत आणि दुसरी अकरावीत शिकत आहेत.