गुन्हेगारी

उरण प्रकरण माहिती झाली उघड ,पोलीस म्हणाले, “२०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी…”

उरणमधील एका २२ वर्षीय तरुणीची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. या तरुणीचे अवयव कापण्यात आल्याचे, चेहरा तसेच गुप्तांगावर जखमा आहेत. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे. त्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. दरम्यान एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्यानंतर या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आरोपीवर २०१९ मध्ये हल्लाही केला होता. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दाऊद शेखकडून यशश्री शिंदेला सातत्याने त्रास दिला जात होता. त्याविरोधात पोलीस तक्रारही करण्यात होती. २०१९ साली याच प्रकारातून यशश्रीच्या वडिलांनी दाऊदवर प्राणघातक हल्ला केला होता. गेल्या पाच वर्षांपासून तो यशश्रीला त्रास देतोय.२०१९ साली उरणमध्ये हे दोघे एका कंपनीत एकत्र काम करत होते. तेव्हा त्यांची ओळख झाली. परंतु, तो तिला त्रास देऊ लागला. या त्रासाबद्दल मुलीच्या घरच्यांना कळल्यानंतर वडिलांनी त्याच्यावर हल्ला केला होता. तसंच, त्याच्याविरोधात यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण करणाऱ्या पोस्को कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल केला होता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. २०१९ मध्ये पीडिता अल्पवयीन होती, त्यामुळे त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानतंर तो दीर्घकाळ तुरुंगातही होताशेखला जामीन मिळाल्यानंतर तो कर्नाटकात गेला. कर्नाटकात गेल्यानंतरही तो तिला संपर्क करायचा प्रयत्न करत होता, असं कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झालं आहे. सार्वजनिक ठिकाणी त्याचा अपमान केल्यामुळे दाऊदच्या मनात तिच्या वडिलांविषयी राग होता, असंही पोलिसांनी सांगितलं. कर्नाटकात बसचालक म्हणून काम करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी माग काढत त्याला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती. गुरुवारी (दि. २५ जुलै) सकाळी कामावर निघाल्यापासून यशश्री बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. पोलीस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडुपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांना मृतदेह अतिशय विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांनाही संशय व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button