ठाणे

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची मागणी,सरकारची भूमिका काय? अजित पवार म्हणाले…

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

१२ ऑगस्ट रोजी घडली. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच याप्रकरणी कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या शाळेविरोधात, गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. दरम्यान, आता या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बदलापूरमधील आंदोलन राजकीय प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावर उपमुख्यंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मी यावेळी ठरवलं आहे की मला योग्य वाटेल तेच बोलेन. इतर लोक, विरोधक काय बोलत आहेत त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला बोलायचं आहे ते बोलतील, मी मात्र मला योग्य वाटेल तेच बोलेन. या घटनेबाबत माझी एकच भावना आहे की असल्या नराधमांना अतिशय कडक शासन केलं पाहिजे. जेणेकरून पुन्हा कोणी असं काहीतरी करण्याचं धाडस करणार नाही. गुन्हेगारांना असं शासन करावं की पुन्हा असं काही करण्याचा विचारही केला नाही पाहिजे.यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी अजित पवारांना विचारलं की बदलापूरसारख्या घटना रोखण्यासाठी, गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देण्यासाठी विधानसभेत यासाठी कायदा करायला हवा असं तुम्हाला वाटतं का?

त्यावर अजित पवार म्हणाले, असा कायदा केंद्र सरकारने करायचा असतो. आम्ही शेवटी केंद्रालाच शिफारस करत असतो. मागे आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात शक्ती कायदा करण्याचा विचार करत होतो. मागच्या सरकारने तसा प्रयत्न केला होता. आपल्या शेजारच्या राज्यात असा कायदा करण्यात आला आहे.

आम्ही त्यांच्या कायद्याचा अभ्यास करून व आपल्या राज्यातील मागणीसंदर्भात विचार करून एक अहवाल तयार करण्यासाठी समिती गठित केली होती. पण त्यावेळी आपल्याला तो कायदा करता आला नाही.अजित पवार म्हणाले, “बलात्काराच्या  घटना पाहून काही लोक म्हणतात की मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. म्हणजे मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही, हे चुकीचं आहे. मुलींबद्दलचा हा दृष्टीकोन चुकीचा आहे. आपण आपलं हे मत बदललं पाहिजे. कारण मुली देखील आपल्या समाजाचा मोठा घटक आहेत. त्याउलट आपण आपल्या माय-माऊली, बहीण व मुलींना संरक्षण दिलं पाहिजे”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button