ठाणे

खडतर स्पर्धेत देशाची मान उंचावली; ठाण्याच्या वाहतूक पोलीस हवालदार दक्षिण आफ्रिकेत पराक्रम

ठाणे : जगातील अतिशय खडतर अशा कॉर्मेड मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने कांस्य पदक पटकावले आहे. या वाहतूक पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ याचे नाव असून त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी त्यांची पाठ थोपटून त्यांचा सत्कार करून कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेतील नुकत्याच पार पडलेल्या जगातील अतिशय खडतर अशी ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्यातील वाहतूक पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ यांनी मनाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेसाठी मेंगाळ यांनी अतिशय चिकाटीने प्रयत्न करून कांस्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. रविवार ११ जून २०२३ रोजी सकाळी ५:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या स्पर्धेत रामनाथ मेंगाळ यांनी अवघ्या १० तास ५८ मिनिटात ९० किलोमीटरचे अंतर पार केले. या स्पर्धेसाठी जगभरातून तब्बल २० हजार हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या २० हजार स्पर्धकांमधून मेंगाळ यांनी कांस्य पदकाची बाजी मारली आहे.

वाहतूक पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ त्यांच्या सह महाराष्ट्र पोलीस खात्यातून तिघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या तिघांपैकी रामनाथ मेंगाळ यांनी बाजी मारली आहे. मेंगाळ यांचे हे यंदाचे दुसरे वर्ष आहे. २८ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी ९ तास ३० मिनिटात रेकॉर्ड केला होता. यंदाच्या वर्षी देखील त्यांची या कार्मेड मॅरेथॉनसाठी निवड झाली. यंदाच्या वर्षी मेंगाळे यांना दुखापत झाली होती. मात्र अथक प्रयत्न आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी हे यश प्राप्त झाले असल्याचे वाहतूक पोलीस हवालदार रामनाथ मेंगाळ यांनी सांगितले. ठाणे वाहतूक शाखेत हवलादर या पदावर कार्यरत असताना स्वतःच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष ठेऊन आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो. मात्र या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ठाणे वाहतूक पोलीस उपयुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी मेंगाळ यांचा सत्कार करून कौतुकाने त्यांची पाठ थोपटली आहे. हवालदार रामन्नाथ मेंगाळ केलेली उत्तम कामगिरी आणि त्यांनी पार पाडलेली कोर्मेड मॅरेथॉन स्पर्धा ही सोपी नसून त्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button