गुन्हेगारी

पुणे पोलिसांनी बँक मॅनेजरच्या खुनातील आरोपीला अश्या पद्धतीने शोधले

पुणे शहरात निवृत्त बँक व्यवस्थापकाचा काही दिवसांपूर्वीच खून झाला होता. पोलीस आरोपींच्या शोधात होते. परंतु आरोपीने कोणताही पुरावा सोडला नव्हता. पोलिसांकडून सर्व पर्याय तपासले गेले होते. त्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहचले नाही.

पुणे : पुणे शहरात निवृत्त बँक व्यवस्थापक रणजित मेला सिंग यांचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी सिंग यांच्याशी संबंधित सर्वांची चौकशी सुरु केली. त्यानंतर पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही. यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या पर्यांयावर विचार सुरु केला. अखेरी एक दुवा पोलिसांना सापडला आणि पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच खून केल्याची कबुली दिली. रणजित मेला सिंग यांच्याकडून नारायण इंगळे याने ३० लाख रुपये उधारीने घेतले होते. इंगळे याने त्याच्या लघुउद्योसाठी हे कर्ज घेतले. परंतु अनेक दिवस झाले तरी ते पैसे परत दिले नाही. सिंग यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे नारायण इंगळे याने सिंग यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याचे मित्र राजेश पवार आणि समाधान म्हस्के यांना ४ लाख रुपयांची सुपारी दिली.

इंगळे याच्या कटानुसार सिंग यांना चिंचवड येथील राहत्या घरी बोलवले. सिंग घरी आल्यानंतर त्यांना बोलत ठेवले. इंगळे आणि राजेश पवार यांनी मागून येऊन सिंग यांचा दोरीने गळा आवळला. त्यावेळी समाधान म्हस्के याने चाकूने चार ते पाच वेळा वार केले. खून केल्यानंतर सिंग यांचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळला. त्यानंतर बेडशीटमध्ये बांधून त्यांच्याच ब्रेझा गाडीत टाकला. पुढे राजेश पवार, समाधान म्हस्के यांनी मृतदेहाची विल्हेवाट ताम्हीणी घाटात लावली. इंगळे चिंचवडमधील तीन मजली पार्वती अपार्टमेंटमध्ये राहत होते. या ठिकाणी वॉचमन किंवा सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. यामुळे पोलिसांना आरोपींना शोध घेणे अवघड होत होते. इंगळे यांनी सिंग निघून गेल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक सिंग यांना सतत संपर्क करत होते. परंतु संपर्क झाला नाही. पोलिसांना या प्रकरणात कोणताही पुरावा मिळत नव्हता. मग पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी सिंग यांची गाडी दुपारी जाताना दिसली. मग पोलिसांनी इंगळे यांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button